गुरुवार, २१ जानेवारी, २०१६

शुद्धलेखन नियम

शुद्धलेखन नियम 
* अनुस्वार - स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा.
* तत्सम शब्दातील अनुनासिकाबद्दल विकल्याने परसवर्ण लिहिण्यास हरकत नाही. मात्र अशावेळी अनुस्वारानंतर येणाऱ्या अक्षराच्या वर्गातील अनुनासिकच परसवर्ण म्हणून वापरावे. उदा - पंडित - पण्डित,
* संस्कृत नसलेले मराठी शब्द शीर्ष बिंदू अनुस्वार देवूनच लिहावेत. उदा - संप, दंगा, खंत.
* अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी कधी कधी परसवर्ण  शब्द लिहिणे योग्य ठरते. उदा - वेदांत - वेदामध्ये.
* नामाच्या व सर्वनामाच्या अनेकवचनी सामान्य रुपानंतर विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावतांना अनुस्वार द्यावा.
* आदरार्थी बहुवचनाच्या वेळीही असा वरीलप्रमाणे अनुस्वार द्यावा. उदा - आपनाणांस,

 नियम [ऱ्हस्व -दीर्घ]
* मराठीतील तत्सम इकारांत व उकारांत शब्द दीर्घान्त लिहावेत. उदा - कवी, हरी, मती, प्रीती.
* मराठी इकारांत व उकारांत शब्द दीर्घान्त लिहावेत. उदा - मी, आई, पेरू, गुरु,
* सामासिक शब्द लिहिताना समासाचे पूर्वपद पहिला शब्द तत्सम ऱ्हस्वन्त असेल तरच ते पूर्व पद ऱ्हस्वान्तच लिहावेत व दीर्घान्त असेल तरच ते दीर्घान्त लिहावे. उदा - कविचरित्र, नदीतीर, भानुविलास.
* तत्सम अव्यये ऱ्हस्वांत लिहावीत. उदा परंतु, तथापि.
* मराठी शब्दातील अकारान्त पूर्वीचे इकार व उकार दीर्घ लिहावेत. उदा मूल, वीट.
* परंतु तत्सम अकारांत शब्दातील उकार इकार किंवा ईकार मूळ संस्कृतप्रमाणे ऱ्हस्व किंवा दीर्घ ठेवावा. गुण, शूर
* मराठी शब्दातील  शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्यातील उपांत्य इकार किंवा उकार संस्कृतप्रमाणे किंवा दीर्घ ठेवावा. उदा पूजा, पीडा, परीक्षा.
* मराठी शब्दातील जोडाक्षर पूर्वीचे इकार व उकार सामन्यात ऱ्हस्व असतात. उदा - कुस्ती, दुष्काळ.
* परंतु तत्सम शब्द मूळ संस्कृतप्रमाणे लिहावेत. उदा - तिक्ष्ण, पूज्य,
* मराठी व तत्सम शब्दातील इकार व उकार युक्त अनुस्वार असल्यास ती अक्षरे सामन्यात: ऱ्हस्व असतात. उदा - चिंच, लिंबू.
* तसेच विसर्गापूर्वीचे इकार व उकार सामान्यता ऱ्हस्व लिहावेत. छि, दु:ख,
* मराठी व तत्सम शब्दातील इकारयुक्त किंवा उकार उभयवचनी सामान्यरूप आंत्य 'ई उ' यांच्याजागी 'अ' आल्याचे दिसते.
* तीन अक्षरी मराठी शब्दाचे पहिले अक्षर दीर्घ असेल तर अशा शब्दाच्या सामान्यरूपात उपांत्य ई - उ यांच्याजागी 'अ' आल्याचे दिसते. उदा - बेरीज, बेरजेत, लाकूड - लाकडाला,
* तीन अक्षरी मराठी शब्दाचे पहिले अक्षर दीर्घ असेल तर
* पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी 'सा' आल्यास त्या जागी सामान्यरूपाच्या वेळी 'शा' होतो. घसा - घशाला.
* तीन अक्षरी शब्दातील मधले अक्षर क किंवा प चे द्वित असेल तर उभयवचनी सामान्य रूपाच्या वेळी हे द्वित नाहीसे होतात.
* मधल्या म पूर्वीचे अनुस्वारसहित अक्षर उभयवचनी सामान्य रूपाच्या वेळी अनुस्वारसहित होते.
* धातूला 'उ' आणि ऊन प्रत्यय लावताना धातूच्या शेवटी व असेल तर वून अशी रूपे होताना पण धातूच्या शेवटी व नसेल तर ऊन अशी रूपे होतात. उदा - धाव - धावून, ठेव - ठेऊन,0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.