शनिवार, २३ जानेवारी, २०१६

Articles - उपपदे

ENGILISH GRAMMAR
Articles - उपपदे 
* इंग्रजी भाषेत उपपदांना अनन्य साधारण महत्व आहे. एकूण उपपदे तीन आहेत. 
* १] A २] AN ३] THE 
* उपपदांचे दोन प्रकार आहेत. 
* १] Indefinite Articles - A, An  २] Definite Articles - The 

[A] उपपद वापरण्याचे नियम 

* A उपपद वापरण्यासाठी सामान्यनाम एकवचनी पाहिजे. 
* ते सामान्य Countable पाहिजे.
* त्याची सुरवात व्यंजनाने झालेली पाहिजे.
* त्याची निश्चित माहिती झालेली नसावी. ex - This is a bird.
* ज्या वस्तू आपण संखेने मोजू शकतो, त्यांना Countabale Things असे म्हणतात.
* एकाच प्रकारच्या वस्तूंना त्यांच्या अंगी असलेल्या गुणधर्माच्या सारखेपणामुळेजे जे सर्वसाधारण नाव दिले जाते. त्यालाच आपण Countable Noun असे म्हणतात.
* इंग्रजीमध्ये एकूण २६ मुळाक्षरे आहेत. व २१ व्यंजने [Consonants] आहेत.
* A उपपद वापरण्याचा अपवाद [Exception] एखाद्या स्वराने सुरु होण्याच्या परंतु त्या स्वराचा व्यंजनासारखा उच्चार होणाऱ्या समान नामापुर्वी देखील व उपपद वापरतात. e.g - a univarsity, a uniform, a union, a unit.
* क्रमाने येणाऱ्या निरनिराळ्या वाक्यामध्ये नियमानुसार A हे उपपद वापरलेल्या सामान्यनामाचा पुन्हा पुन्हा वापर करावा लागत असेल तर त्या नामाच्या पहिल्या नामापुर्वी A नंतरच्या वापरापूर्वी The हे उपपद वापरतात.
e.g - This is a book. The book is written by tagore.
* एखाद्या सामान्य नामापुर्वी विशेषण असून त्या विशेषणाची सुरुवात व्यंजनाने झालेली असल्यास त्यापूर्वी व उपपद वापरतात.

[AN] उपपद वापरण्याचे नियम 
*  An उपपद वापरण्यासाठी सामान्यनाम एकवचनी पाहिजे.
* ते सामान्यनाम Countable असले पाहिजे.
* त्याची सुरवात स्वराने झालेली पाहिजे.
* त्याची निश्चित माहिती झालेली नसावी. e.g - 1]I saw an elepahant wandering in the forest.2] That is an ant. It is an ink-pot.
* स्वर पाच आहेत. A, E, I, O, U.
* An उपपद वापरण्याचा अपवाद. एखाद्या सामान्य नामाची सुरवात h ने झालेली असून त्याचा उच्चार स्वरासारखा होत असेल तर त्या सामान्यनामापुर्वी an उपपद वापरतात. E.g -1] Rekha will return within an hour.
* स्वरासारखा उच्चार होणाऱ्या व्यंजनानी सुरवात झालेल्या सामन्यनामापुर्वी an उपपद वापरतात. Eg - I saw an old man lying in the world. an M.A, An M.P, An S.P.
* क्रमाने येणाऱ्या निरनिराळ्या वाक्यामध्ये नियमानुसार an उपपद वापरलेल्या सामान्य नामाचा पुन्हा पुन्हा वापर करावा लागत असेल तर त्याच्या पाहिल्यापुर्वी an आणि नंतरच्या वापरापूर्वी the उपपद वापरावे.
Eg. I saw an old man lying in the mud.   The old man was none but the grnadfather of my friend.
* एखाद्या सामाण्यनामापुर्वी विशेषण वापरलेले असून त्याची सुरवात स्वराने झालेली असेल तर त्यापूर्वी an उपपद वापरतात. eg - I saw an old man.

The उपपद वापरण्याचे नियम 
* The हे उपपद वापरण्यासठी सामान्यनाम एकवचनी किंवा अनेकवचनी पाहिजे.
* ते सामान्यनाम Countable किंवा uncountable पाहिजे.
* त्याची निश्चित माहिती झालेली पाहिजे. The table, the river, the children, the milk, the sky,
* The हे उपपद वापरण्याचे काही नियम
* जगातील एकमेव वस्तूच्या नामापुर्वी the उपपद वापरतात. The gateway of india, The taj mahal.
* सुर्याकुलातील वस्तूंच्या नामापुर्वी The उपपद वापरतात. The sun, moon, star,
* नद्यांच्या नावापूर्वी The वापरतात. The ganga, godavari, arebian sea.
* दिशांच्या नावापूर्वी the वापरतात. The east, west, north, south
* धार्मिक ग्रंथाच्या नावापूर्वी The वापरतात. The ramayan.
* पर्वतांच्या नावापूर्वी The वापरतात. The Himalaya.
* क्रमवाचक संख्याविशेषण याच्या पूर्वी the उपपद वापरतात.
* एखाद्या सामान्य नामापुर्वी जोर देताना त्यापूर्वी the हे उपपद वापरतात.
* प्रतिनिधीत्व करणाऱ्या एकवचनी सामाण्यनामापुर्वी the हे उपपद वापरावे.
* डावी बाजू व उजवी बाजू यांचा उल्लेख करतांना the चा उपयोग करतात.
* एकदा उल्लेख झालेल्या सामान्यनामाचा पुन्हा पुन्हा वापर होत असल्यास त्यापूर्वी the उपपद वापरतात.
* संपूर्ण कुटुंबाचा उल्लेख करताना आडनावाच्या अनेकवचानापुर्वी the उपपद वापरतात.
* विशेषनापूर्वी उपपद वापरत नाहीत. परंतु एखाद्या विशेषनामाचा वापर दुसऱ्या विशेषनामाला उपमा देण्यासाठी होत असेल तर त्यापूर्वी the उपपद वापरतात.

उपपदासंबंधी आणखी विशिष्ट नियम 
* उपपदे फक्त सामान्य नामापुर्वी वापरतात.
* A किंवा An म्हणजे एक सामान्य नामापुर्वीच वापर केला असेल तर स्वतंत्र A व An ला अर्थ नाही.
* The म्हणजे तो, ती, ते, त्या, ती, सामान्य नामापुर्वी वापर केलेला असेल तरच स्वतंत्र The ला अर्थ नाही.
* खेळ व रस्त्यांच्या नावापूर्वी उपपद वापरत नाही.
* home या शब्दापूर्वी उपपद नाहीत. seeta came home.
* जेवणाची व रोगांची नवे यांच्यापूर्वी उपपद वापरत नाहीत.
* भाषा, दिवस,महिने, यांच्यापुढे The हे उपपद वापरतात.
* संबोधन विभाक्तीमध्ये सामान्यनामाचा वापर करताना त्यापूर्वी उपपद वापरत नाहीत.
* विशेषनापुर्वी उपपद वापरात नाहीत.
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.