गुरुवार, ३१ डिसेंबर, २०१५

द्रावणाचे सामर्थ्य (Strenth of Solutions)

द्रावणाचे सामर्थ्य (Strenth of Solutions) 
द्रावणे -
दोन किंवा अधिक पदार्थाच्या समांग मिश्रनाच्या द्रावण असे म्हणतात. द्रावक + द्राव्य = द्रावण
जलीय द्रावण -
ज्या द्रावणात पाण्याचा वापर द्रावक म्हणून केला जातो. त्याला जलीय द्रावण म्हणतात.
अजल द्रावण -
ज्या द्रावणात पाण्याव्यतिरिक्त इतर द्रावकाचा वापर करण्यात येतो त्याला अजल असे म्हणतात.
उदा - बेंझीन, इथर, कार्बन, टेट्राक्लोराईड,
द्रावणाचे प्रकार -
द्रावणाचे स्थायू - पाऱ्यामध्ये तांबे
द्रवामध्ये वायू - पिण्याचा सोडा
वायूमध्ये वायू - हवा
द्रवामध्ये द्रव - अल्कोहोल आणि पाणी
स्थायुमध्ये स्थायू - पितळ
शुद्ध पाणी हे द्रावक आहे.
आम्ल - जो पदार्थ पाण्यात विरघळला असता H+ आयन देतो त्याला आम्ल म्हणतात. HCL
आम्लारी - जो पदार्थ पाण्यात विरघळता असता OH - आयन देतो त्याला अम्लारी म्हणतात. NAOH
आम्ल आणि अम्लारीची जलीय द्रावणाची परस्परात अभिक्रिया होवून क्षार आणि पाणी तयार होतात. यालाच उदासीकरण म्हणतात. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.