बुधवार, ३० डिसेंबर, २०१५

मूलद्रव्याचे वर्गीकरण (Classification of Eliments)

मूलद्रव्याचे वर्गीकरण (Classification of Eliments)
आजमितीस १०६ मूलद्रव्ये मानवनिर्मित अल्पजीवी आहेत.
मोस्ले - आधुनिक आवर्ती नियम मुलद्रव्याच्या मुलभूत गुणधर्म त्याचे अणु वस्तुमान हा नसून त्याचा अणुक्रमांक (Z) हा आहे. मुलद्रव्याच्या अणु क्रमांकावर आधारित असा आधुनिक आवर्ती नियम पुढीलप्रमाणे आहे.
नियम - 
मूलद्रव्यांचे गुणधर्म त्यांच्या अनुक्रमांकाचे आवर्ती फल असतात. म्हणजेच ते त्याच्या केंद्रकातील प्रोटॉन व इलेक्ट्रोन संख्येचे आवृत्ती फल असतात. आधुनिक आवर्तसारणीत मुल्द्रव्याची मांडणी त्याच्या अणुअंकानुसार (Z) केलेली असते. आधुनिक आवर्तसारणीचा आवर्तसार्णीचे दीर्घ रूप म्हणतात.
आधुनिक आवर्तसारणीत ७ आडव्या ओळी आहेत. त्यांना आवर्त असे म्हणतात. आणि १८ उभे स्तंभ आहेत त्याला गण असे म्हणतात. संपूर्ण आवर्तसारणी S, P, D, F, या खंडात विभागली आहे.
* आधुनिक आवर्त सारणीत सात आवर्त आहेत.
* पहिल्या आवर्तात दोन मूलद्रव्ये H =१, He =२
* दुसऱ्या व तिसऱ्या आवर्तामध्ये प्रत्येकी आठ मूलद्रव्ये आहेत.
* चौथ्या आणि पाचव्या आवर्तामध्ये प्रत्येकी १८ मूलद्रव्ये आहेत.
* सहावा आवर्त हा दीर्घतम असून त्यात ३२ आवर्त आहेत. व त्यांना दीर्घ आवर्तन असे म्हणतात.
* सातवा आवर्त हा अपूर्ण आहे. त्याच्यात ३० मूलद्रव्ये आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.