बुधवार, २३ डिसेंबर, २०१५

जीवनप्रक्रिया - भाग १

जीवनप्रक्रिया - भाग १ 
पोषण, प्रकाशसंश्लेषण, श्वसन - 
पेशिवृधी आणि विकारासाठी अन्नद्रव्य प्राप्ती व उपयोजन प्रक्रिया म्हणजेच पोषण होय.
पोषणाच्या दोन पद्धती -
स्वतःची अन्ने स्वतःच तयार करणे सजीवाच्या पोषणास स्वयंपोषी पोषण असे म्हणतात.
उदा. वनस्पती, शैवाल, जीवाणू. 
उर्जा स्त्रोतावर पोषण पद्धतीचे दोन प्रकार 
१) प्रकाश संश्लेषी पोषण पद्धत - 
ज्या पोषण पद्धतीत प्रकाशाचा वापर उर्जा म्हणून केला जातो त्याला प्रकाशसंश्लेशी पोषण पोषण असे म्हणतात.
२) रसायनसंश्लेषण पोषण पद्धत -
ज्या पोषण पद्धतीत अकार्बनी रसायनांचा वापर केला जातो. त्यास रसायनसंश्लेशी पोषण असे म्हणतात.
उदा. नायट्रीफाईग जीवाणू, लोह उपचयनी, जीवाणू व गंधक उपचयनी जीवाणू व गंधक उपचयनी जीवाणू स्वतःचे अन्न कार्बनीय अन्न रसायन संश्लेष्णातून तयार करतात.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.