शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

महाराष्ट्रातील २०११ जणगणनुसार लोकसंख्येविषयी प्रमुख मुद्दे

महाराष्ट्रातील सर्वात जास्त पुरुष लोकसंख्येचा जिल्हा ठाणे आहे.
* महाराष्ट्रातील सर्वात कमी पुरुष लोकसंख्येचा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. 
* महाराष्ट्रातील सर्वात जास्त स्त्री लोकसंख्येचा ठाणे जिल्हा आहे. 
* महाराष्ट्रातील सर्वात कमी स्त्री लोकसंख्याचा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा.
* महाराष्ट्रातील एक कोटी लोकसंख्येवरील जिल्हा ठाणे होय.
* महाराष्ट्रातील २०११ च्या जणगणनेनुसार जास्त घनतेचे पहिले पाच जिल्हे - मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे,                  पुणे कोल्हापूर,
* महाराष्ट्रातील २०११ नुसार कमी घनतेचे पहिले पाच जिल्हे - गडचिरोली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, रत्नागिरी, यवतमाळ.
* २०११ च्या लोकसंखेच्या घनतेचा दर ३६५ आहे. तर राष्ट्रीय घनतेचा दर ३८२ आहे.
* महाराष्ट्रामध्ये देशातील ९.२९% एवढी लोकसंख्या राहते.
* महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तर पहिले पाच जिल्हे - रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदीया, सातारा, भंडारा,
* महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तर शेवटचे पाच जिल्हे - मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, बीड.
* महाराष्ट्राच्या साक्षरतेचे पहिले पाच जिल्हे - मुंबई उपनगर, नागपूर, मुंबई शहर, अमरावती, अकोला.
* महाराष्ट्राच्या साक्षरतेचे शेवटचे पाच जिल्हे - नंदुरबार, गडचिरोली, बीड, जालना, धुळे.
* महाराष्ट्राच्या पुरुष साक्षरतेचे पहिले पाच जिल्हे - मुंबई उपनगर, नागपूर, सिंधुदुर्ग, गोंदिया, अकोला.
* महाराष्ट्राच्या पुरुष साक्षरतेचे शेवटचे पाच जिल्हे - नंदुरबार, गडचिरोली, धुळे, बीड, जालना.
* महाराष्ट्राच्या स्त्री साक्षरतेचे पहिले जिल्हे - मुंबई उपनगर, मुंबई शहर, नागपूर, अमरावती, अकोला.
* महाराष्ट्राच्या स्त्री साक्षरतेचे शेवटचे जिल्हे - नंदुरबार, गडचिरोली, जालना, बीड, परभणी.
* २०११ सालच्या जणगणनेनुसार महाराष्ट्रात ग्रामीण लोकसंख्या ६.१५ कोटी आहेत.
* एकूण लोकसंख्येशी टक्केवारी ५४.७७ आहे.
* महाराष्ट्रात राष्ट्रीय स्तराच्या मानाने ग्रामीण लोकसंख्या १३.७७ टक्क्यांनी ५४.७७ आहे.
* महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या ५.०८ कोटी आहे.
* राष्ट्रीय स्तरावर नागरी लोकसंख्येची ३१.१६% एवढी आहे.
* महाराष्ट्रात नागरी लोकसंख्येची टक्केवारी ४५.२३ एवढी आहे.
* महाराष्ट्रात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे आणि नागपूर जिल्हे हे सर्वात जास्त नागरीकरण झालेले जिल्हे आहेत.
* गडचिरोली, सिंधुदुर्ग, आणि हिंगोली हे किमान नागरीकरण झालेले जिल्हे आहेत.
* मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे जिल्हे १००% नागरी जिल्हे आहेत.
* महाराष्ट्रात ग्रामीण लोकसंख्येची सर्वात जास्त टक्केवारी गडचिरोली ८९.००% असून त्या खालोखाल सिंधुदुर्ग व            हिंगोली जिल्हा येतो. 
* महाराष्ट्रात नागरी क्षेत्रात रायगड जिल्ह्यात सर्वात जास्त लोकसंख्या वाढीचा दर ८२.८९% एवढा आहे.
* महाराष्ट्राची ग्रामीण दशवार्षिक वाढ १०.३४% एवढे आहे.
* महाराष्ट्राची नागरी दशवार्षिक वाढ  २३.६७% एवढे आहे.
 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.