शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

तिसरी पंचवार्षिक योजना (१९६१-१९६६)

शेती व उद्योग यांना एकत्रितरीत्या प्राधान्य देणारी तुलनेने मोठ्या आकाराची म्हणून तिसऱ्या योजनेकडे पहिले जाते.
या योजनेचे १९६४ पर्यंत पंडित नेहरू हे या योजनेचे अध्यक्ष होते. उरलेल्या काळात लालबहादूर शास्त्री हे अध्यक्ष            होते. हि योजनाही पी सी महालनोबीस यांच्या प्रतीमानावर आधारित होती.
* राष्ट्रीय उत्पन्नात प्रती वर्षी ५.६% दराने वाढ, अन्नधान्य उत्पादन कमी असल्याने अन्नधान्य उत्पन्नाच्या बाबतीत                स्वयंपूर्ण होणे, पोलाद,रसायने,यंत्रसामुग्री, पायाभूत स्वरूपाचे उद्योगधंदे वाढविणे, देशातील श्रमशक्तीचा जास्तीत              जास्त वापर करणे, अधिक रोजगाराच्या संधी, विकास असमतोल व संपत्ती वाटपातील विषमता कमी करणे, ही
   या योजनेची उद्दिष्टे होती.
* या योजनेत सार्वजनिक प्रस्तावित खर्च ७,५०० कोटी रुपये प्रत्यक्षात या योजनाकाळात ८,५७७ कोटी रुपये
   सार्वजनिक क्षेत्रात खर्च केले. औद्योगिक क्षेत्रात २०.१%, वाहतूक व दळणवळण क्षेत्रात २४.६%, उर्जासाधानावर
   १४.६%, जलसिंचन प्रकल्पावर ७.८%,इत्यादी रक्कम खर्च झाली.
* या पार्श्वभूमीवर हि योजना यशस्वी होऊ शकली नाही. राष्ट्रीय उत्पन्नात ५.६% दराने उद्दिष्ट असताना २.७%
   इतपत वाढ साध्य झाली.
* या सर्व पातळ्यावर ही योजना अयशस्वी ठरली. या योजनेची चुकीची उद्दिष्टे, व चुकीची धोरणे, व राजकीय आर्थिक
   परिस्थिती यामुळेच हि योजना अयशस्वी ठरली.
* या योजना काळात १९६६ मध्ये रुपयाचे अवमूल्यन करावे लागले. त्यामुळे निर्यातीस चालना मिळावी असा यामागे
   हेतू होता.
   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.