रविवार, १३ डिसेंबर, २०१५

महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग

रचनात्मक भूगोल 
१. कोकण किनारपट्टी
२. सह्यान्द्री पर्वत किंवा पश्चिम घाट, सह्यांद्रीच्या व सातपुड्याच्या पर्वतरांगा
३. महाराष्ट्र पठार किंवा दख्खन पठारी प्रदेश किंवा देश
               
कोकण किनारपट्टी - 
                           महाराष्ट्र पच्छिम भागात दक्षिणोत्तर पसरलेली लांब व चिंचोळी किनारपट्टी कोकण आहे. तर पश्चिमेस  अरबी पसरलेला आहे. सह्यान्द्री पर्वत व अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेल्या या लांबट चिंचोळ्या सखल भागाला कोकण असे म्हणतात.
कोकणची निर्मिती  -
                           महाराष्ट्रच्या पश्चिमेला व अरबी समुद्राला लागून असलेल्या प्रस्तरभंग होऊन कोकण किनारपट्टी तयार झाली. तसेच मुंबई जवळील जलमग्न अरण्याचा प्रदेश असे दर्शवतो की किनारपट्टीवर समुद्राची पातळी उंचावली गेली असावी. म्हणजेच किनाऱ्याचे निमज्जन (खचणे) झालेले आहे. ज्वालामुखी क्रियेचे अवषेस गरम पाण्याच्या रूपाने आढळतात. उदा वज्रेश्वरी येथील
गरम पाण्याचे झरे. कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी सुमारे ७२० कि मी उत्तरेस डहाणूपासून वेगुर्ल्यापर्यंत उत्तरेस दमणगंगा नदीपासून दक्षिणेस तेरेखोल नदीपर्यंत त्याचा विस्तार आहे. सरासरी रुंदी ३० ते ६० कि मी आहे. उत्तरेस काही भागात किनारपट्टी ९० ते ९५ कि मी रुंद आहे. कोकणचे भोगोलिक क्षेत्रफळ सुमारे ३०३९४ चौ.कि.मी आहे.
कोकणची प्राकृतिक रचना -
                                    कोकणचा सर्वच भाग हा म्हणजे एक सलग भाग मैदान नाही. हा डोंगरदऱ्यानी व्यापलेला परंतु कमी उंचीचा सखल भाग आहे. किनाऱ्यापासून पूर्वेकडे सह्यांद्रीच्या पायथ्यापर्यंत ही उंची सुमारे२५० मीटरपर्यंत वाढते.
प्रदेशाचा सर्वसाधारण उतार पूर्व पश्चिम दिशेने आहे. पश्चिमेस अरबी समुद्राच्या सखल भागाला खलाटी असे म्हणतात. समुद्र सपाटीपासून उंची फार कमी आहे. खलाटीच्या पूर्वेस जो डोंगराळ भाग आहे. त्याला (वलाटी) असे म्हणतात. या प्रदेशाची उंची २७५ ते ३०० मीटरपर्यंत आहे.
खाडी -
           भरतीचे पाणी नदीच्या मुखात जेपर्यंत आत शिरते तेवढ्या नदीच्या भागाला खाडी असे म्हणतात. मुंबईच्या उत्तरेस दातिवरे व वसईची खाडी आहे. तर वसईच्या दक्षिणेस जयगडपर्यत धरमतर, राजकोट, बाणकोट, दाभोळ व जयगडच्या खाड्या आहेत. दक्षिणेस विजयदुर्गची खाडी कार्लीची खाडी व कोकणच्या दक्षिण सरहद्दीजवळ तेरेखोलची खाडी आहे. कोकणची किनारपट्टी रिया प्रकारची आहे. किनार्यावरील खडकात मालवण व हरणे दरम्यान गुहा आढळतात.
सागरी किल्ले - 
                   वसईचा किल्ला, जंजीरा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, आणि सिंधुदुर्ग हे समुद्री किल्ले आहेत.
बंदरे -
         महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर मुंबई हे एक नैसर्गिक बंदर आहे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे बंदर आहे. मुंबई ताण  कमी करण्याच्या दृष्टीने न्हावाशेवा हे अत्याधुनिक बंदर आहेत.

सहयाद्री पर्वत किंवा पश्चिम घाट - 
                                              भारताच्या पश्चिम किनारपट्टीस सहयांद्री समांतर पर्वत आहे. हा पर्वत दख्खनच्या पठाराची सरहद निच्छित करतो. उत्तरेस सातमाळा डोंगरापासून दक्षिणेस कन्याकुमारीपासून सह्यांद्री पसरलेला आहे. त्यांची लांबी सुमारे १६०० कि मी आहे. यापैकी महाराष्ट्रात ४४० कि मी लांबीचा पर्वत आहे. यास पश्चिम घाट या नावानेही संबोधले जाते. त्याच सरासरी उंची ९१५ ते १२२० मीटर आहे. महाराष्ट्रामध्ये सह्यान्द्रीची उंची उत्तरेकडे वाढत जाते. तर दक्षिणेकडे कमी होत जाते.
                                                     काही ठिकाणी १००० मी पर्यत आहे. पश्चिमेस एकदम तीव्र आहे. पूर्वेकडून पहिल्यास पठारावर सह्यांद्रीच्या उतार इतका मंद आहे. कि ते एक डोंगराची रांग आहे. वैतरणा व सावित्री नद्याच्या उगमाच्या क्षेत्राजवळ सह्यांद्री कंकणाकृती झालेला आहे. सह्यान्द्री पर्वत रंगामुळे अरबी समुद्रास मिळणाऱ्या पश्चिमवाहिनी नद्यांच्या आणि बंगालच्या उपसागरात मिळणाऱ्या पूर्ववाहिनी नद्यांचे जलविभाग वेगवेगळे झालेले आहेत. सह्यांद्रीच्या घाटमाथ्यची उंची निरनिराळी आहे आणि प्रत्येक ठिकाणी ती जलविभाजक आहेच नाही.

सह्यान्द्री पर्वताच्या डोंगररांगा किंवा डोंगराळ प्रदेश -
                                                         सह्यांद्री पर्वताच्या  मोठ्या डोंगररांगा सह्यान्द्रीपासून सर्वसाधारणपणे पूर्वेकडे जातात. तापी पूर्णाच्या दक्षिणेस  रांगा पसरलेल्या आहेत. स्थानिक आधारतल रेषेच्या वर डोंगराची उंची २०० ते ३०० मी दरम्यान आहे. बऱ्याच ठिकाणी डोंगरास तीव्र कडे आहेत.

सह्यांद्रीच्या डोंगररांगा -                                                                                                                                                                      शंभूमहादेव डोंगररांग - सह्यांद्रीच्या पर्वतापासून रायरेश्वरापासून शिंगणापूर पर्यंत पसरलेल्या रांगेला शंभूमहादेव रांग म्हणतात. या डोंगररांगा सातारा सांगली जिल्ह्यातून पुढे कर्नाटकात जातात. भीमा नद्याच्या खोऱ्यात दक्षिणेस शंभू महादेव रांग आहे. यामुळे भीमा व कृष्णा या नद्यांची खोरे वेगवेगळी झालेली आहेत. महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठी शंभूदेव डोंगररांग आहे. उदा. वाईजवळील पाचगणी व महाबळेश्वर (टेबल लैड) असे म्हणतात.
                                 हरिश्चंद्र-बालाघाट- डोंगररांग -गोदावरीच्या दक्षिणेस हरिश्चंद्र बालाघाट तिच्यामुळे गोदावरी व भीमा  खोरी वेगळी होतात. या डोंगररंगाच्या पश्चिम भागात हरिश्चंद्र घाट व पूर्व भागास बालाघाट या नावाने ओळखले जातात. बालाघाट हा सपाट माथ्याचे प्रदेश आहे.
                                  सातमाळा अजिंठा डोंगररांग - गोदावरी व तापी नदीच्या खोऱ्याना वेगळी करणारी सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे. नाशिक जिल्ह्यात सातमाळा डोंगररांग आहे. देवगिरीचा किल्ला, अजिंठ्याची लेणी, याच रांगेत आहेत. डोंगराच्या पश्चिम भागास सातमाळा डोंगर असे म्हणतात. नाशिक जिल्ह्याच्या वायव्य कोपऱ्यात सातमाळा डोंगररांग सुरु होते. सातमाळा अजिंठा डोंगररांगाच्या पूर्वेस उतार स्वरूपाचा आहे तर पश्चिम बाजूस तीव्र उतार आढळतो.
अन्य डोंगररांग किंवा टेकड्या -
                                      धुळे जिल्ह्यात गाळणा डोंगर, औरंगाबाद - वेरूळ डोंगर, हिंगोली - नांदेड - हिंगोली मुदखेडच्या टेकड्या, नागपूर- गरमासुर टेकड्या, गोंदीया- दरकेसा टेकड्या, भंडारा- गायखुरी डोंगर, गडचिरोली - चिरोली टेकड्या, भामरागड- सुरजगड डोंगर,

सातपुडा पर्वतरांग व डोंगररांग - 
                                          महाराष्ट्रात सातपुडा पर्वत रांगेचा फारच  भाग समविष्ट आहे. पूर्व पश्चिम दिशेने पसरलेल्या सातपुडा पर्वत रांगेमुळे नर्मदा व  नदीचे खोरे झालेले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात पश्चिम भागात तोरणमाळ हे एक लहान आकाराचे पठार असून त्यांची उंची १०३६ मी आहे. तर त्या भागातील सर्वात उंचीचे शिखर अस्तंभ डोंगर असून त्याची उंची १३२५ मी आहे. सातपुडा पर्वत रांगेचा काही भाग अमरावती जिल्ह्यात आढळतो. त्यास गाविलगड टेकड्या असे म्हणतात. त्यांची रुंदी २० ते ४० कि मी आहे. या ठिकाणी डोंगराची उंची १००० मी पेक्षा जास्त आहे. येथील वैराट हा डोंगर महत्वाचा आहे. वैराट डोंगराची उंची ११७७ मी तर चिखलदराची उंची १११५ मी आहे. अमरावतीच्या गाविलगड टेकड्यांचा दक्षिण उतार अतिशय तीव्र स्वरूपाचा आहे. याची उंची १२०० ते ३०० मी पर्यंत प्रदेशाची उंची कमी होते.

महाराष्ट्र पठार किंवा दख्खन पठार - 
                                              सह्यंद्री पर्वताच्या पूर्वेस विशाल असा पठारी प्रदेश असे म्हटले आहे. त्यास महाराष्ट्र पठार असे म्हणतात. हा  प्रदेश दख्खनच्या पठाराचा सर्वात प्रदेश आहे. नद्यांच्या खोऱ्यानी महाराष्ट्र पठार  झालेले आहे. पठाराचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी ७५० कि मी आहे. दक्षिणोत्तर लांबी ७५० कि मी आहे. पठाराची सर्वसाधारण उंची ४५० कि मी आहे. महाराष्ट्रचा ९०% भूभाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे.
                                                                                                                                                            महाराष्ट्र पठाराची निर्मिती - 
                                    ७० दशलक्ष वर्षापूर्वी दख्खनच्या प्रदेशास भूपृष्टावर प्रचंड भेग पडून भ्रशमुलक झाला आणि लाव्हारसाचे संचयन झाले. लाव्हारसापासून महाराष्ट्र पठार तयार झाल्याने त्यास दाखखन लावा असेही म्हणतात. लाव्हारसाचे २९ वेळा संचयन होऊन सर्तेशेवटी पठार तयार झाले. हा लाव्हारस प्रामुख्याने बेसिक प्रकारचा आहे.

दख्खनची पठारे -
                           बालाघाट-अहखानपूर,मदनगर, सासवडचे पठार, औंध पठार, खानपूर जात- पठार, बुलढाणा पठार, मालेगाव पठार, मांजरा पठार, तोरणमाळ पठार, इत्यादी.

दख्खनच्या पठारावरील खोऱ्यांचा प्रदेश -
                                                  महाराष्ट्राच्या पठारावरील प्रदेश हा मुख्यत्वेकरून नद्यांच्या खोऱ्यासाठी प्रसिद्ध आहे.
महाराष्ट्र पठारावर उत्तरेकडून दक्षिणेकडे आल्यास नद्याची पुढील खोरी पहावयास मिळतात.
तापी पूर्णा खोरे- 
                     विशेषता भुरचनेच्या दृष्टीने पाहता महाराष्ट्रातील गोदावरी, भीमा, कृष्णा नद्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. उत्तरेस तापी पूर्णा खोरे मध्य प्रदेशाकडून सातपुडा पर्वतरागामुळे पठाराच्या इतर भागापासून अलग झालेले आहे. तापी पूर्णा हा ख्चादारीचा प्रदेश आहे. पश्चिमेकडे ते गुजरातच्या मैदानाकडे उतरत जातात. तर पूर्वेस साधारण प्रतीच्या जलविभागामुळे वर्धा नदीपासून वेगळे झाले आहे. तापी पूर्णा नदीचा खोऱ्याचा प्रदेश उत्तरेकडे व दक्षिणेकडे सातपुडा पर्वत व सातमाळा अजिंठा डोंगररांगांनी मर्यादित झालेला आहे. पत्रामधून या रांगा तीव्र कड्यासारखा भासतात.

गोदावरी खोरे - 
                     महाराष्ट्राचे सर्वात जास्त विस्ताराचे गोदावरी खोरे आहे. सातमाळा अजिंठा डोंगररांगामुळे गोदावरी खोरे  तापी खोरयापासून अलग झालेले आहे. तर दक्षिणेकडील बालाघाट डोंगररांग ही भीमा खोरयापासून गोदावरी खोरे अलग करते. गोदावरी खोऱ्याचा पश्चिमेकडील अरुंद आहे. जसजशी नदी पूर्वेकडे वाढत जाते तसतसा मात्र रुंद होत जातो.
खोऱ्यांची सर्वसाधारण उंची ३०० ते ५५० मी आहे. खोऱ्याचा आकार नरसाळा प्रमाणे दिसतो.

प्राणहिता खोरे - 
                      विदर्भाच्या पूर्वेकडील भाग वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, व प्राणहिता या नद्यांचा खोऱ्यानी व्यापलेला आहे. प्रदेशाचा सर्वसाधारण दक्षिण दिशेने आहे.

भीमा खोरे - 
                  जरी भीमा ही कृष्ण नदीची उपनदी असली तरीही महाराष्ट्रात संपूर्णपणे स्वतंत्ररीत्या भीमा नदी वाहते. म्हणून भीमा खोऱ्याचा स्वतंत्र केला जातो. ती सह्यान्द्री मध्ये भीमाशंकर येथे सुमारे ५००  कि मी पूर्वेस वाहत जाते. कर्नाटकात कृष्णा नदीस मिळते. भीमा नदीच्या खोर्याचे क्षेत्र मध्य महाराष्ट्रात पसरलेले आहे. उत्तरेस हरिश्चंद्र बालाघाट दक्षिणेस शंभू महादेव डोंगररांग यामुळे भीमा खोरे मर्यादित झालेले आहे. भीमेला घोड, सीना, तसेच मुळा,  नीरा व मन नद्या मिळतात.
या खोऱ्याच्या पश्चिमेस सह्य्न्द्रि पर्वत व पायथ्यलगत मावळ प्रदेश आहे.

कृष्णा खोरे - 
                  कृष्णा खोऱ्याचे सर्वात कमी आहे. कृष्णा खोऱ्याने राज्याचा दक्षिण भाग व सह्यांद्रीच्या पूर्व भागात व्यापलेला.
कृष्णा खोऱ्याची मर्यादा पश्चिमेस सह्यान्द्री पर्वत व पूर्वेस शंभू महादेव रांगांनी निश्चित झालेली असेल. कृष्णा खोऱ्याची
                  
महाराष्ट्रतील खडक समूह -जमीन 

गाळाची जमीन - नदीच्या प्रवाहामुळे तयार झालेली चिकन, चिकन पोयटा व वाळूचे  असलेली जमीन, एक दशलक्ष ते दोन                          कोटी वर्षे तापी,पूर्णा,वैनगंगा नदीचे खोरे गाळाची जमीन.४.७.%.
जांभा खडक -   जांभा खडक मुख्यत: लोहप्राणीदयुक्त सच्छिद्र खडक, एक दशलक्ष ते दोन कोटी वर्ष, रान्तागिरी                                    जिल्ह्याचा दक्षिण भाग सिधुदुर्ग जिल्हा पुणे, सातारा, व कोल्हापूर जिल्ह्यातील सह्यान्द्री पर्वताच्या                                    माथ्याचा भाग म्हणजे जांभा खडक होय.
दख्खनचा काळा -
                        डेक्कन trap विभाग म्हणून संबोधले जाते.दोन कोटी ते चार कोटी वर्षे, महाराष्ट्राचा संपूर्ण भाग भंडारा                             गोंदिया गडचिरोली चंद्रपूर, रन्तागिरी, व कोल्हापूर जिल्ह्याच्या  वगळता इतर सर्व जिल्हे. ८१. ३ क्षेत्र.
अप्पर गोंडवना\ लोवर गोंडवाना -
                                   दहा ते तीस वर्षे जुनी तीस वर्ष जुनी नागपूर,चंद्रपूर, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांचा भाग येतो १.५% इतकी जमीन आहे.
 काब्रीयन समूह - 
                      साकोली व सौसर मालेतील अतिप्राचीन रुपांतरीत खडक, चारशे कोटी वर्षे, संपूर्ण भंडारा गोंदिया व गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्याच्या भागात.१०% भाग या जमिनीचा आहे.                             

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.