शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

महाराष्ट्रातील वनक्षेत्र

महाराष्ट्रातील वनक्षेत्र  -                    

राज्यात कृषीव्याप्त जमिनीनंतर दुसरे मोठे क्षेत्र हे वनाखाली येते. राज्याच्या वनविभागानुसार वनचे क्षेत्र ५५,८१९ एवढे आहे. त्या एकूण क्षेत्रापैकी ८४% राखीव, ११%संरक्षीत, ५% अवर्गीकृत आहे. वनच्या अच्छादनानुसार मध्यम दाट जंगल ४० ते ७० टक्क्यापर्यंत आहे. खुले वन जेथे १० ते ४० टक्के आहे. खुरटे वने १० टक्क्यापेक्षा कमी आहे.

सामाजिक वनीकरण -
                               रस्ते, लोहमार्ग, कालवे, नद्यांचे प्रवाह, शाळा, महाविद्यालये, शासकीय मालकीच्या मोकळ्या जागा, नापीक क्षेत्र, या ठिकाणी वृक्षारोपण केले जाते याला सामाजिक वनीकरण म्हणतात.

वनसंरक्षण -
                   महाराष्ट्रातील उपलब्द असलेल्या वनस्पतीच्या प्रकारांचे संरक्षण करणे आवश्यक आहे. कारण राज्यामध्ये एकूण वनक्षेत्र पैकी २०% क्षेत्र अरण्याखाली आहे. राष्ट्रीय वनधोरणानुसार राज्यामध्ये एकूण जमिनीच्या ३३.३३% अरण्ये असावयास पाहिजे. यासाठीच वन संरक्षणाची गरज आहे.

वृक्षारोपण कार्यक्रम  - 
                             वृक्षारोपण हा २० कलमी कार्यक्रम एक भाग असून सामाजिक वनीकरण विभागामार्फत २०१० ते २०११ नुसार वृक्षारोपण वन विभाग यांच्या मार्फत करण्यात येतो.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.