शुक्रवार, १८ डिसेंबर, २०१५

कार्य आणि उर्जा

कार्य आणि उर्जा 
एखाद्या वस्तूवर क्रिया करणाऱ्या बलामुळे त्या वस्तूचे बलाच्या दिशेने विस्थापन झाले तरच कार्य झाले असे म्हणतात.
कार्याचे मापन - पदार्थावर प्रयुक्त केलेल्या बलाचे कार्य हे बलाचे परिणाम आणि पदार्थाचे बलाच्या दिशेने आक्रमिलेले अंतर यांच्या गुनाकाराइतके असते.
केलेले कार्य = बल * बलाच्या दिशेने  झालेले  विस्थापन होय.
* बल व विस्थापन एकाच दिशेने प्रयुक्त होतात.
* बल हे ऊर्ध्वगामी दिशेने व विस्थापन हे क्षितीज समांतर असल्यास कार्य होत नाही.
* बल व विस्थापन हे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने असतील तर कार्याचे मुल्य ऋण असते.

उर्जा 
एखाद्या पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजे त्या पदार्थाची उर्जा होय. उर्जा ही आदिश राशी होय.
गतिज उर्जा - 
पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या उर्जेस गतिज उर्जा असे म्हणतात. सुटलेली गाळी. सूत्र W=१\२mv२
स्थितीज उर्जा -
पदार्थाला विशिष्ट स्थितीमुळे किंवा आकारामुळे त्यात जी उर्जा सामावलेली असते. तिला स्थितीज उर्जा असे म्हणतात.
डोंगरावरील दगड किंवा धरणात साठवलेली पाणी होय. सूत्र - W=mgh

उर्जा अक्षय्यतेचा नियम -
उर्जा निर्माण करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही. तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रुपांतर करता येते. तथापि विश्वासातील एकूण उर्जा एकूण अक्षय राहते.
आईनस्टाइन च्या मते E =mc२  C = प्रकाशाचा वेग
* स्प्रिंग दाबली असता स्प्रिंगची स्थितीज उर्जा वाढते.
* MKS पद्धतीत कार्याचे एकक ज्युल आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.