गुरुवार, ३१ डिसेंबर, २०१५

धारा विद्युत भाग ३ ओहमचा नियम

धारा विद्युत भाग ३ 
ओहमचा नियम 
वाहकाची भौतिक स्थिती कायम राहत असताना वाहकामधून जाणारी विद्युत धारा I हि त्या वाहकाच्या दोन टोकामधील विभवंतराच्या V समानुपाती असते. R = V\I 
स्थिरांकास रोध R असे म्हणतात. 
वाहकाच्या दोन टोकामध्ये एक व्होल्ट विभवांतर प्रयुक्त केले असता वाहकातून एक अम्पिअर विद्युत धारा जात असेल तर त्याला वाहकाचा एक असे म्हणतात. तांबे चांदी यासारख्या सहायाने ओहामच्या नियमाची पडताळणी करता येते. म्हणून या पदार्थाच्या ओहमनीय वाहक असे म्हणतात. थर्मिस्टर हे ओहामच्या नियमाचे साधन आहे.
एकसर जोडणी 
प्रत्येक रोधामधून समान विद्युत धारा जाईल. अशा पद्धतीने जर अनेक रोध जोडले तर त्या जोडणीस रोधांची एकसर जोडणी असे म्हणतात.
समांतर जोडणी 
प्रत्येक रोधाच्या दोन टोकामध्ये समान विभवांतर प्रयुक्त व्हावे यासाठी अनेक रोध सामाईक बिंदूमध्ये जोडण्याचा व्यवस्थेस रोधांची समांतर जोडणी असे म्हणतात.
* विभवांतराचे SI एकक व्होल्ट आहे.
* विद्युत धारा मोजण्यासाठी अमिटर वापरतात.
* ज्या पदार्थात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विद्युत प्रभार सहजासहजी जाऊ शकत नाही. त्या पदार्थांना विसंवाहक म्हणतात.
* विसंवाहक म्हणून प्लास्टीक  पदार्थ वापरतात.
* विद्युत धारेचे SI एकक अम्पिअर आहे.
* अतिवाहकाचा उपयोग संगणकात केला जातो. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.