मंगळवार, २२ डिसेंबर, २०१५

प्राण्याचे वर्गीकरण - भाग २

प्राण्याचे वर्गीकरण - भाग २
संघ प्लाटीहेल्मिथिस -
शरीर चपटे व सडपातळ असल्यामुळे यांना चपटे कृमी असे म्हणतात. हे प्राणी अंत:परजीवी ते सर्व गोड्या पाण्यात आढळतात. हे द्विपार्श सममित आहेत. उभयलिंगी व त्रिस्तरीय प्राणी रचना आहे.
उदा . प्लनेरिया, लिव्हरफ्लूक, टेपवर्म.

संघ नेमटोडा - अस्कयरिस, फायलेरीया, हुकवर्म, यांनाच गोलकृमी असे म्हणतात. 
संघ अनिलिडा - यात खंडीभवन आढळते, त्यांना खंडीभूत कृमी असे म्हणतात. स्वतंत्र जालवासी प्राणी उभयलिंगी व एकलिंगी प्राणी यांचा समावेश होतो.
उदा . - गांडूळ, लीच, नेरीस, गांडूळाचे १०० ते १२० खंडात विभाजन होते.

संघ अर्थोपोडा - संधीपाद प्राणी 
अर्थोपोडा प्राण्यातील सर्वात मोठा संघ आहे. खोल महासागर व उंच पर्वतावर सर्वच भागात आढळतात. ह्यांना प्रचलन संधी उपांग आहेत म्हणून त्यांना संधिवात प्राणी असे म्हणतात.
उदा - खेकडा, कोळी, मिलीपेड, झुरळ. 

संघ मोलुस्का -
हा प्राण्याचा दुसरा सर्वात मोठा संघ आहे.  सर्वच भूतलावर आढळणारे प्राणी ह्यांचे शरीर मृदुकाय प्रकारचे असते.
उदा. शंख, शिंपले, गोगलगाय, ऑक्टोपस.

संघ इकायनोडर्माटा -
हे प्राणी समुद्रात आढळतात. उदा. तारामासा, सी - अर्चीन, ब्रीटल स्टार, सी ककुंबर.

संघ हेमीकॉर्डाटा -
यांना अकॉर्ण कृमी म्हणतात. श्वसन अनेक कल्ला विदरे असतात.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.