रविवार, १३ डिसेंबर, २०१५

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

जन्म परिचय - 
                      महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म २३ एप्रिल १८७३ रोजी कर्नाटकातील जामखिंडी येथे  झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी शिंदे व आईचे यमुनाबाई असे होते. महर्षी शिंदे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जामखिंडी  येथे झाले. शाळेत हुशार विद्यार्थी म्हणून ओळख. १८९१ मध्ये म्याट्रिकची परीक्षा पास करून १८९३ ला उच्च शिक्षणसाठी पुण्यात आले व तेथील फर्गुसन कॉलेज मध्ये नाव दाखल केले. १८१८ मध्ये त्यांनी बी ए ची पदवी संपादन केली. पदवी परीक्षा प्राप्त केल्यावर त्यांनी वकिलीचा अभ्यासक्रम पूर्ण केला.
सामाजिक कार्य- 
                        १९१० नंतर त्यांनी प्राथना समजाची स्थापना केली. डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या अस्पृश्य बांधवाच्या उद्धाराच्या कार्य करणाऱ्या महर्षी शिंद्यांनी १८ ओक्टो १९०६ रोजी डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया(भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळ)
प्रमुख उद्देश पुढीलप्रमाणे-
                                   असृश्यता समाजात शिक्षणाचा प्रसार घडवून आणणे, अस्पृश्यता बांधवाना नोकरीच्या संधी उपलब्द करून देणे. अस्पृश्यता निवारणाच्या कार्याची दिशा ठरवण्यासाठी महर्षी शिंदे यांनी २३ व २४ १९९८ रोजी  महाराज सयाजीराव यांच्या अध्यक्षतेखालील मुंबई येथे भारतीय अस्पृश्यासाठी निवारण परिषद आयोजित केली.
शंकर चार्यानी त्यांना (आधुनिक काळातील महान कालीपुरुश ) म्हणून  निषेध केला होता १९३३ मध्ये (भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न) हे पुस्तक लिहून या प्रश्नाकडे लक्ष वेधले.
संस्थात्मक कार्य - 
                           २६ ओक्टो १९१७ रोजी (त्यांनी राष्ट्रीय मराठा संघ ) व पुढे २३ मार्च १९१८ रोजी अस्पृश्याविरोधी समितीची स्थापना व अस्पृश्यता निवारण संघ याची स्थापना केली. महर्षी शिंद्यांनी १ सप्टेंबर १९२० रोजी बहुजन पक्षच जाहीरनामा जाहीर केला. (बहुजन समाज) हा शब्दप्रयोग शिंदे यांनी सर्वप्रथम केला म्हणून या शब्दाचे पालकत्व त्यांच्याकडे जाते.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.