शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

महाराष्ट्रातील रेल्वे वाहतूक

भारतीय उपखंडात १८४० साली ब्रिटीश कोर्पोरेशानला रेल्वे बांधण्यास परवानगी मिळाली. प्रथम मुंबई पासून उत्तरेस आणि पूर्वेस तसेच कोलकत्त्यापासून उत्तरेस आणि पश्चिमेस रेल्वे बांधण्यास सुरवात झाली. भारतात पहिली रेल्वे १८५३ साली मुंबई ते ठाणे दरम्यान सुरु झाली. महाराष्ट्रामध्ये २०१२ सालानुसार रेल्वेमार्गाची एकूण लांबी ५,९८४ कि मी कोकण रेल्वे ३८२ कि मी आहे. गेल्या ५१ वर्षात राज्यामध्ये रेल्वे मार्गाची लांबी फक्त १८.४ टक्क्यांनी वाढली.

रेल्वे मार्गाचे प्रकार -
रुंद मार्ग (ब्रॉड गेज) - या मार्गातील दोन रूळामध्ये १.६७ मीटर अंतर असते.
मध्यम रुंद मार्ग (मीटर गेज) - या मार्गातील दोन रुळातील अंतर १ मीटर असते.
अरुंद मार्ग (न्यरो गेज ) - या मार्गातील दोन रुळातील अंतर ०.७६२ मीटर असते.

प्रमुख ब्रॉडगेज रेल्वेमार्ग - महाराष्ट्र राज्य 
मुंबई - दिल्ली (मध्य रेल्वे)
मुंबई - दिल्ली (पश्चिम रेल्वे)
मुंबई - चेन्नई (ग्रांड ट्रक)
दिल्ली - चेन्नई (ग्रांड ट्रक)
मुंबई - दिल्ली (मुंबई - सिकंदराबाद)
मुंबई - कोलकाता
मुंबई - कोल्हापूर

महाराष्ट्रातील अंतर्गत ब्रॉडगेज -
पुणे - मिरज, मिरज - कोल्हापूर, मांजरी - वणी - राजूर, मनमाड - औरंगाबाद,
दौड - मनमाड, चाळीसगाव - धुळे, तदळी - घुगुस, औरंगाबाद - जालना, परळी वैजनाथ - उदगीर,
जलंब - खामगाव, कन्हान - रामटेक, दौड - बारामती, कर्जत - खोपोली, बडनेरा - अमरावती,
तुमसर रोड - तिरोडा, नरखेड - अमरावती,पूर्णा - खंडवा,

महाराष्ट्रातील न्यारोगेज -
नेरळ - माथेरान, मुर्तीजापूर - अचलपूर -यवतमाळ, पाचोरा - जामनेर,
लातूर - चंद्रपूर, पुलगाव - आर्वी,

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.