शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

चौथी पंचवार्षिक योजना (१९६९-१९७४)

* १९६८-६९ या काळात शेतीक्षेत्रातील परिस्थितीत बरीच सुधारणा झाली. त्याचा औद्योगिक परिस्थितीवर परिणाम
    व त्याची ६.२% दराने वाढ झाली.
* इंदिरा गांधी हे या योजनेच्या अध्यक्ष होत्या. व अर्थशास्त्री डॉ धनंजयराव गाडगीळ हे या योजनेचे उपाध्यक्ष होते.
   या योजनेची सर्व आखणी गाडगीळ यांची असल्यामुळे या योजनेला गाडगीळ यांच्या प्रतीमानावर आधारित होती
   असे म्हणता येईल.
* या योजनेत राष्ट्रीय उत्पन्नात ५.७% म्हणजे २८% वाढ घडवून आणणे. निर्यातीसाठी समतोल साधण्यासाठी प्रतिवर्षी
   ७% वाढ घडवून आणणे. रोजगार व शिक्षण या माध्यमातून असंरक्षित व दुर्बल घटकाच्या विकासावर अधिक भर होता.
* थोडक्यात स्वयंपूर्णतेकडे जलद वाटचाल, आर्थिक विकास, प्रादेशिक समतोल, ही प्रमुख उद्दिष्टे होती. यामुळेच ही
   योजना समतोल आर्थिक विकास या प्रतीमानावर आधारित होती.
* या योजनाकाळात शेतीविकासात १४.७%, जलसिंचन क्षेत्रासाठी ८.६%, उर्जा क्षेत्रात १८.६ %, उद्योग व खान क्षेत्रात
   १८.२%,तर वाहतूक व दळणवळण क्षेत्र यासाठी १९.५%, खर्च करण्यात आला.
* भारत व पाक युद्ध याच्या मुळे शेती व उद्योग यांची उद्दिष्टे साध्य न झाल्यामुळे सर्व गोष्टी केवळ कागदावरच राहिल्या
   लोकसंख्या नियंत्रणास व बेरोजगारीचे गंभीर स्वरूप साध्य झाले.
* या योजनाकाळात ५.७% उदिष्ट होते पण २.०५% उदिष्ट साध्य झाले. ही योजना अनेक आघाड्यावर अपयशी ठरली
   व याच काळात कृषी उत्पन्नास चालना मिळून व हरित क्रांतीची सुरुवात झाली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.