शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

महाराष्ट्रातील मानवी वसाहती

मानवी वसाहत म्हणजे मानवाने प्राकृतिक पर्यावरणाशी साधलेले एक महत्त्वाचे अनुकूलन किंवा समायोजन आहे. संघटीत लोकांची एकत्रित राहण्याची निवासस्थाने म्हणजे वसाहत होय. 
मानवी वसाहत -  उदय व विकास 
अश्मयुगीन महाराष्ट्र, मध्याश्म युग, नवाश्मयुग, ताम्रपाषाण युग, लोहयुगीण, इत्यादी संस्कृती महाराष्ट्रात उदयास येतात. 
महाराष्ट्रातील ग्रामनामे व नगरनामे - 
मूळ शब्दाला प्रत्यय लाऊन झालेली नावे - ग्राम नावामध्ये अधिक प्रमाणात वापरले जाणारे प्रत्यय म्हणजे गाव,पूर,वाडी,खेड,बली,ओली,वाडा,डर,घर,आणि,पुरी,
प्रत्यय नसलेली गावे - पुणे,नाशिक,चिपळूण. 
कसबा - कसबा म्हणजे कसबी किंवा कारागीरांचे वसतीस्थान. कसबा हे जरी नगर असले तरी याची सामाजिक व आर्थिक अभिमुखता अधिक असते. उदा. कसबा - बावडा, गगनबावडा. 
मौजे - मौजे पद्धतीच्या खेड्याच्या वाड्या असतात. गावात विविध कारागीर, व्यापारी, त्या गावात बाजार भरतो. ग्रामीण जनता हे शेतमाल व जनावरांची विक्री - खरेदी करतात. अशा कृषीप्रधान खेड्याला मौजे असे म्हणतात. 
खुर्द - बुद्रुक - लहान खेड्याच्या नावापुढे खुर्द तर मोठ्या गावांच्या पुढे बुद्रुक लावतात. दोन्ही गावाच्या मधून नदी वाहते. 

ग्रामीण वसाहतीचे प्रकार - 
विखुरलेल्या एकाकी वसाहती - एक किंवा एकापेक्षा जास्त कुटुंबे जेव्हा परस्परापासून थोड्या दूर अंतरावर राहतात. यामुळे निर्माण होणाऱ्या वसाहतीला विखुरलेल्या वसाहती असे म्हणतात. 
सघन\ केंद्रित वसाहती - एकापेक्षा जास्त गृहसमूह एकत्र येवून वस्त्याचे केंद्रीकरण होते. त्याला सघन केंद्रित वस्ती असे म्हणतात.  
विखंडीत /अपखंडीत वसाहती - एकाच वसाहतीमधील घरांचे समूह अलग अलग, कमी जास्त अंतरावर अनियमित वसलेले असतात. त्यास विखंडीत अपखंडीत वसाहत असे म्हणतात. 
महाराष्ट्रातील ग्रामीण वसाहतीची प्रारूपे - 
रेषाकृती, रेखाकृती, केंद्रोत्यागी-त्रिज्याकार, बनाकृती प्रारूप, ताराकृती, गोलाकार-वर्तुळाकार, चौकोनाकृती-चौकपट्टीय, चौकोनी, शिडीच्या आकाराचे प्रारूप.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.