शुक्रवार, २५ डिसेंबर, २०१५

रक्तकणिका / रक्तपेशी

रक्तकणिका / रक्तपेशी 
लोहित रक्तकणिका - ( Blood Cells ) 
लहान वर्तुळाकार केंद्रक नसलेल्या पेशी आहेत. रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटर मध्ये ५० ते ६० लक्ष लोहित रक्तकणिका असतात. हिमोग्लोबिनमुळे रंग तांबडा असतो. लोहित रक्तकनिकांची निर्मिती अस्थिमज्जेमध्ये होते.
श्वेत रक्तकणिका -
आकाराने मोठ्या रंगहीन पेशी असतात. रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटर मध्ये ५००० ते १०००० श्वेत रक्त कणिका असतात. त्याचे पाच प्रकार बेसोफील, ओसीनोफील, न्युटरोफील, मोनोसाईटस, लिम्फोसाईट्स, या रक्तकानिकांची
निर्मिती फ्लीहेत आणि आस्थिमज्जा यात होते.
रक्त पट्टिका - 
ह्या लहान, घन मीटर मध्ये २.५ लाख ते ४ लाख असतात. ह्या रक्त गोठण्याची क्रिया सुरु करण्याचे कार्य करतात.
लसिका -
कोशिकामधून पाझरत असलेला फिकट पिवळसर रंगाचा आणि लोहित रक्तकणिका नसलेल्या द्रायुस लसिका म्हणतात.
रक्ताची कार्ये -
वायूचे परिवहन, पोषणतत्वाचे परिवहन, टाकाउ पदार्थाचे परिवहन, शरीर रक्षण विकार आणि संप्रेरक, तापनियमन शरीराचे तापमान, ३७'c इतके कायम असते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.