रविवार, १३ डिसेंबर, २०१५

कर्मवीर भाऊराव पाटील

जीवन परिचय
                      कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म २२ सप्टे १८८७ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला. भाऊराव पाटील विट्याच्या शाळेतून मराठी पाचवी इयत्ता उत्तीर्ण झाल्यावर त्यांना पुढील शिक्षणासाठी कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलच्या मध्ये टाकले. त्या ठिकाणी त्यांनी सहावीपर्यंत शिक्षण घेतले. म्याट्रिक होण्यापूर्वीच त्यांना शिक्षण  लागले.
शिक्षण कार्य  -
                     भाऊराव पाटलाने आपल्या शेक्षणिक कार्याची सुरुवात सांगली जिल्ह्यातील दुधगाव या ठिकाणी या ठिकाणी केली. १९१० मध्ये काही लोकांच्या मदतीने (दुधगाव विद्यार्थी आश्रम) व दुधगाव या ठिकाणी केली. या वस्तिग्रुह्त सर्व जातीजमातीचे विद्यार्थी एकत्र राहत होते. या धर्तीवर नेर्ले आणि कार्ले या गावी वसतिगृह सुरु केली.
रयत शिक्षण संस्थेची स्थापना - 
                                           कर्मवीर भाऊराव पाटील सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते. सन १९१९ मध्ये सत्यशोधक समाजाच्या सातारा जिल्ह्यातील कार्ले या गावी परिषद भरविण्यात आली. ग्रामीण भारतात शिक्षणाचा प्रसार ४ ओक्टो १९१९ रोजी कार्ले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. १९२४ मध्ये रयत शिक्षण संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय सातारा येथे नेण्यात आले.
                                           १९२४ मध्ये कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेच्या वतीने सातारा येथे छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस हे वसतिगृह सुरु केले. विद्यार्थ्याच्या उच्चशिक्षणाची  व्हावी म्हणून सन १९३२ मध्ये  त्यांनी पूर्णे येथे युनिअन बोर्डिंग हाउस ची स्थापना केली त्यास गांधी आंबेडकर यांच्यामधील पुणे कराराचे निमित्त होते. यामुळे त्यांनी पुणे कराराची जतन केले.
संस्थेचे प्राथमिक शाळांचे जाळे - 
                                                १६ जुले १९३५ रोजी कर्मवीरांनी प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी सातारा येथेच सिल्वर जुबली रुरल ट्रेनिग कॉलेज सुरु केले. संस्थेच्या ७०० शाळा महाराष्ट्र शासनाला सुपूर्त केल्या. रयत शिक्षण संस्थेच्या पहिली माध्यमिक शाळा साताऱ्यात (महाराजा सयाजीराव हायस्कूल) या नावाने १९४० मध्ये सुरु केले.
                                                १९७७-७८ साली माध्यमिक शाळांची संख्या ३१२ वर गेली. १९४७ साली  संस्थेने छत्रपती शिवाजी कॉलेज या नावाने महाविद्यालय सुरु केले.
 मान सन्मान -
                     भारत सरकारने त्यांना (पद्मभूषण) हा  दिला. पुणे विद्यापीठाने त्यांना (डी लिट) ही पदवी बहाल केली. ह रा महाजनांनी भाऊरावचा गौरव महाराष्ट्राचे बुकर. टी. वॉशिंग्टन असा केला.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.