गुरुवार, ३१ डिसेंबर, २०१५

धारा विद्युत

धारा विद्युत 
कुलोमचा नियम -
दोन प्रभारित पदार्थाच्या दरम्यान निर्माण होणारे विद्युत बल F हे त्या दोन प्रभाराच्या q १ व q २ गुणाकाराच्या स्मानुपती असून त्यांच्यातील अंतराच्या r वर्गाची व्यस्तानुपती असते.
K यास चलनाचा स्थिरांक म्हणतात. स्थिर प्रभारामुळे घडणाऱ्या भौतिक परिणामाला स्थितीक विद्युत असे म्हणतात.
गतिमान प्रभारामुळे घडणाऱ्या भौतिक परिणामाला धारा विद्युत असे म्हणतात.
ज्या पदार्थापासून प्रभार एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सहज जाऊ शकतात. त्यांना वाहक असे म्हणतात. धातूमध्ये मुक्त इलेक्ट्रोनची संख्या जास्त असल्याने ते सुवाहक आहे.
उदा - तांबे, सोने, चांदी,
विद्युत घटाच्या धन अग्र आणि ऋण अग्र यांच्या विद्युत पातळीमधील फरक म्हणजेच त्या घटाचे विभवांतर होय.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.