शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

महाराष्ट्रातील मृदा व जलसिंचन

महाराष्ट्रातील मृदेचे प्रकार - काळी मृदा, जांभा मृदा, गाळाची मृदा, तांबडी मृदा, व पिवळसर मृदा.

१) काळी मृदा - 
                        महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मृदा व महत्त्वाची मृदा म्हणजे दख्खनच्या पठारावरील कापसाची काळी मृदा आहे. तिने दख्खनच्या पठारावरील सर्वात जास्त प्रदेश व्यापलेला आहे. सह्यान्द्री पर्वताच्या पूर्वेकडे घाटमाथा ओलांडल्यावर संपूर्ण प्रदेश काळ्या मृदेचा असून विदर्भातील पूर्वेकडील प्रदेश वगळता सर्वत्र काळी मृदा आढळते. ज्याप्रमाणे मृदेची जाडी बदलते त्याचप्रमाणे रंगही गडत काळ्या रंगाचा असून फिकट होत असतो. महाराष्ट्रात सर्वात उत्तम प्रकारची मृदा गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी नदीच्या खोऱ्यात आढळते.
                          मृदेचे गुणधर्म - नद्याच्या खोऱ्यात मृदेची सुपिकता जास्त प्रमाणात असते. पठारावरील मृदा ही फिकट रंगाची पातळ आणि मध्यम रंगाची असते. तिच्यामध्ये ओलावा टिकवून धरण्याची क्षमता असते. त्या जमिनीची सुपीकता कमी होत नाही. कोरड्या हवेमध्ये काळी मृदा भूसभूसित होते. कडक उन्हामुळे मोठ्या भेगा पडतात.
                          मृदेतील पिके - या मृदेत सर्व प्रकारची पिके येतात. विदर्भात कापूस तर पश्चिम महाराष्ट्रात उस हे नगदी पिक आहेत. खान्देशात कापूस व केळी यांच्या बागा आहेत.

२) जांभी मृदा - 
                    महाराष्ट्रात दक्षिण भागात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, व गडचिरोलीच्या भागात जांभी मृदा आढळते.
 मृदेचे गुणधर्म - उंच डोंगराळ प्रदेशात तसेच सखल प्रदेशात जांभी मृदा आढळते. या मृदेमध्ये बॉक्साईट चे साठे आढळतात. या मृदेचा रंग तांबूस तपकिरी किंवा पिवळसर तांबड्या छटांचा असतो. पिके - काळ्या मृदेपेक्षा या मृदेची सुपीकता कमी आहे. तरी या मृदेत काजू ,आंबा,नारळ,चिकू,हे पिके चांगली येतात.

३) किनाऱ्याची गाळाची मृदा - 
                                        महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी लगत सखल प्रदेशात गाळाची मृदा आहे. तिला भाबर मृदा असे म्हणतात. हि मृदा कोकणात उत्तर दक्षिण दिशेने किनारपट्टीलगत नारळ व पोफळीच्या बागा आढळतात. वाळूमिश्रित ही मृदा लों प्रकारची आहे.  

४) तांबडी मृदा -
                        महाराष्ट्रामध्ये तांबडी मृदा थोड्याच भागात आहे. सह्यांद्रीच्या भागात कोकणालगत त्याचप्रमाणे विदर्भाच्या पूर्व भागात वर्धा नदीच्या व वैनगंगेच्या नद्याच्या खोऱ्यात आढळते. उंचावरच्या प्रदेशात तांबडी मृदा असत नाही. ती कमी सुपीक वाळूमिश्रित सछिद्र आणि फिकट रंगाची असते. या जमिनीत भरड धान्ये, बाजरीचे धान्य इत्यादी पिके घेता येतात.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.