शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

पहिली पंचवार्षिक योजना (१९५१-५६)

भारत पंचवार्षिक योजनेची आखणी -  
                                                   भारतात आजपर्यंत एकूण दहा पंचवार्षिक योजना राबविण्यात आल्या असून अकराव्या योजनेची अंमलबजावणी सुरु आहे. नियोजन आयोगाची रचना हा पंचवार्षिक योजनेचा पहिला टप्पा होय.
योजना आयोगात एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष, आणि इतर यांचा अंतर्भाव असतो. पंचवार्षिक योजनेत पाच वर्षे इतका
आहे. या योजनांचा निद्रेश आपण पंचवार्षिक योजना असा करतो. देशाचा सूत्रबद्ध व सर्वसमावेषक विकास करता यावा यासाठी दर पाच वर्षांनी या योजना राबविण्यात येतो.

* पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पंतप्रधान या नात्याने पहिल्या नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते, तर गुलझारीलाल      नंदा हे या आयोगाचे उपाध्यक्ष होते.
* दुसऱ्या महायुद्धामुळे व देशाच्या फाळणीमुळे विस्कळीत झालेल्या अर्थव्यवस्थेची घडी नीट बसविले. पश्चिम बंगाल हा        तांदूळ व तागाचे उत्पादन करणारा व सिंध हा कापसाचा उत्पादन करणारा प्रदेश पाकिस्तान समविष्ट झाल्याने                  अन्नधान्य कापूस व ताग यांच्या पुरवठ्याच्या स्थितीत सुधारणा घडून आणणे १९३९ पासून देशात सातत्याने सुरु            असलेली अतिरेकी भाववाढ काबूत आणणे.
* नवीन सिंचन प्रकल्प, जलविद्युत प्रकल्प उभारणे, व रेल्वेच्या झिजून गेलेल्या भांडवली जिंहिक दगीचे नुतनीकरण करणे.
* पुनरुथान योजना या उपनामाने ओळखली जाणारी हि योजना हेरॉल्ड डोमर यांच्या प्रतीमानावर आधारित होती.
* पहिल्या योजनेत एक समान आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन योजना यशस्वीपणे पार पडावी          यासाठी एक निती तयार केली.
* दुसरे महायुद्ध व फाळणीमुळे निर्माण झालेले प्रश्न सोडविणे, वाहतूक, आरोग्य, शेती, उद्योग, यांचा कमी खर्चात विकास      करणे.
* या योजनेत सार्वजनिक क्षेत्रात २,०६९ कोटी रुपये खर्च करणे अपेक्षित होते. नंतर ही तरतूद २,३७८ कोटी रुपये            करण्यात आली. प्रत्यक्ष १,९६० एवढाच खर्च झाला.
* दामोदर खोरे व हिराकूड योजना हे बहुद्देशीय प्रकल्प याच काळात हाती घेतले.
* सिंद्री झारखंड येथील खात कारखाना चित्तरंजन रेल्वे डब्यांचा कारखाना, पेराम्बुर येथील रेल्वे येथील डब्यांचा                कारखाना इत्यादी योजना या काळात हाती घेण्यात आल्या.
* याच काळात देशात १९५२ पासून (समुदाय विकास कार्यक्रम) याची सुरवात झाली.
* या योजना काळात राष्ट्रीय स्थूल उत्पन्न २.१% वाढवण्याचे उदिष्ट होते.
* परंतु ही योजना मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली राष्ट्रीय उत्पन्न ३.६% म्हणजे एकूण योजनाकाळात १८ टक्के इतकी          वाढ झाली.
* या योजनेत शेती क्षेत्रात झालेली वाढ हि नैसर्गिक अनुकूलतेमुळे झाली असे टीकाकार म्हणतात.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.