शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

अकरावी पंचवार्षिक योजना (२००७-१२)

* राष्ट्रीय विकास परिषदेने आपल्या बावन्नाव्या बैठकीत ९ डिसेंबर २००६ रोजी अकराव्या पंचवार्षिक योजनेचा आराखडा
   स्वीकृत केला होता.
* या योजना काळात प्रतिवर्षी ९% वृद्धीदर साध्य करणे निर्धारित करण्यात आले.
* अधिक व्यापक पाया असलेली, सर्वसमावेशक व जलद, या शब्दातच या योजनेचे वर्णन केले गेले.
* योजनेत ९% दर ठेवला होता पण ८.२% दर साध्य करण्यात यश आले.
* अकराव्या योजनेच्या शेवटच्या वर्षतील अपेक्षित वृद्धीदर साध्य कायम २०१६-१७ पर्यंत दरडोई उत्पन्न दुपटीवर              नेण्याचे ठरवले.
* कृषी क्षेत्रात ४% दराने वृद्धी घडवून आणणे उदिष्टीत होते. औद्योगिक क्षेत्रात प्रतिवर्षी १०.५% दराने तर सेवा क्षेत्रात
   ९.९% दराने वृद्धी घडवून आणणे, अपेक्षित होते.
* योजना काळात ५.८ कोटी इतका नवा रोजगार निर्माण करण्यात यावयाचा होता.
* अकुशल कामगाराच्या वास्तव वेतनात २०% वेतनवाढ यात वृद्धी घडून आणणे अपेक्षित होते.
* योजनेअखेर साक्षरतेचा दर ८५% वाढवण्याचे योजनेचे निर्धारित केले होते.
* उच्च शिक्षण घेणाऱ्या ठराविक वयोगटातील युवकांचे १०% प्रमाण तर १५% टक्क्यावर नेण्यात आले होते.
* बालकाच्या मृत्यूचे प्रमाण २८% पर्यंत या योजनेचे ठरविले होते.
* स्त्रियांचे प्रमाण २०११ ते २०१६-१७ पर्यंत ९५० वाढविणे उदिष्टीत होते.
* सन २००९ मध्ये सर्वाना वीज,पाणी,प्रत्येक खेड्यात दूरध्वनी, प्रत्येक खेड्यापर्यंत रस्ते यासारखी उदीष्टेची विहित
  केली होती.
* २०११ ते १२ पर्यंत सर्व मोठ्या शहराचे जागतिक आरोग्य संघटनेने विहित केलेल्या दर्जाची हवा मिळणे योजनेत              अभिप्रेत होते.
* योजनेअखेर देशातील वनांचे प्रमाणही ५% वाढविणे या योजनेत उदिष्टीत होते.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.