शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

दुसरी पंचवार्षिक योजना (१९५६-१९६१)

* या योजनेत उद्योग क्षेत्राला अग्रकम देऊन यातून जलद आर्थिक विकास साध्य करण्याचे तत्व ठरविले.
* या योजनेचे अध्यक्ष पंडित नेहरू होते. हि योजना महालनोबीस यांच्या परिमाणावर आधारित होती.
* राष्ट्रीय उत्पनात प्रतिवर्षी पाच टक्क्यांनी वाढविणे आणि दहा दक्षलक्ष लोकांना रोजगार निर्माण करणे अवजड व पायाभूत
   उद्योगांच्या विकासावर भर देण्यात आला. उत्पन्न व संपत्ती मधील समान वाटप घडवून आणणे.
* या योजना काळातील सार्वजनिक क्षेत्र यातील ४८०० कोटी एवढा होता. प्रत्यक्ष खर्च ४६७२ कोटी एवढा होता.
* सार्वजनिक क्षेत्रात केलेल्या एकूण क्षेत्रात ११.७०% खर्च शेती व समाजविकासावर, ९.७०% एवढा खर्च मोठ्या व            मध्यम जलसिंचन योजनावर, ९.७०% खर्च उर्जाक्षेत्रात, २०.१०% खर्च उद्योग व खनिजे या क्षेत्रात, तर २७% क्षेत्र
   वाहतूक व दळणवळण क्षेत्रात केला. ४% खर्च लघु व ग्रामौद्योग वाट्यास आली.
* या योजनेच्या काळात समाजवादी समाजरचनेचे ध्येय निश्चित केल्या गेले.
* या योजनेच्या काळात रशियाच्या मदतीने भिलाई छत्तीसगढ, जर्मनीच्या महणजे तत्कालीन पश्चिम जर्मनीच्या मदतीने
   रुरकेला ओडिशा येथे, तर ब्रिटनच्या मदतीने दुर्गापूर प. बंगालच्या येथे पोलादनिर्मिती प्रचंड प्रकल्प उभारले गेले.
   नानगल पंजाब येथे खत कारखाना, सिद्री येथील खत कारखाना, चित्तरंजन येथे रेल्वे कारखाना,
* या योजनाच्या काळात शेती व वाहतूक क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या यंत्र सामुग्रीच्या उत्पादनासाठी वाढ
   घडवून आणली गेली.
* राष्ट्रीय उत्पन्न प्रतिवर्षी ४.५% दराने वाढविणे, मुलभूत अशा कारखानदारीची वाढ घडून आणणे. या योजनेअखेर              उत्पन ४.२ इतकी वाढ घडून आली.
* सुएझ कालव्याचा प्रश्न,मोसमी पावसाने दिलेला दगा, या योजनेत सामोरे जावे लागते.
* रोजगार वृद्धी हे या योजनेचे एक प्रमुख उद्देश होता. व योजनेअखेर बेरोजगाराच्या संख्येत वाढ न होता वृद्धी झाली.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.