शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

पाचवी पंचवार्षिक योजना (१९७४-१९७९)

भारताने लोकशाही समाजवादाचे उदिष्ट साध्य करण्यासाठी आर्थिक नियोजनाचा मार्ग स्विकारला. असला तरी पाचव्या योजनेच्या सुरवातीपर्यंत लोकशाही समाजवाद प्रत्यक्षात बराच दूर राहिला आहे.
* या योजनेच्या काळात इंदिरा गांधी आणि धनंजय गाडगीळ हेच अध्यक्ष व उपाध्यक्ष होते.
* बी एस मिन्हास व एल आर जैन व तेंडूलकर यांच्या अभ्यासगटाच्या निष्कर्षानुसार १९७० ते १९७१ या दरम्यान            ५६.३० टक्के लोक दारिद्रयरेषेखाली होते.
* या योजनेत राष्ट्रीय उत्पन्नात ५.५% दराने वाढ घडवून आणणे. हे उदिष्ट ४.४ टक्यापर्यंत खाली आले. उत्पादक                रोजगारात वाढ घडवून आणणे. समाजातील दुर्बल घटकांना प्राथमिक गरजेच्या वस्तूंचा पुरवठा करणे. निर्यात
   व आयातीवर पर्यायीकरणावर भर देणे.
* सामाजिक, आर्थिक, व प्रादेशिक विषमता कमी करण्यात आली व संस्थात्मक, राज्यवित्तीय, आणि उपाययोजना
   करणे यासारखी उदिष्टे या योजनाकाळात निश्चित करणायत आली.
* रुद्र यांच्या प्रतीमानावर आधारित असलेल्या या योजनेच्या अंतिम मसुदा दुर्गाप्रसाद धर यांनी तयार केला होता.
* थोडक्यात दारिद्रय निर्मुलन, आर्थिकदृष्ट्या, आत्मनिर्भरता, स्वावलंबन, व सामाजिक न्याय ही या योजनेची
   प्रमुख उदिष्टे होती. असे सांगता येईल. या योजनाकाळात (किमान गरजा कार्यक्रम) राबविण्यास सुरुवात करण्यात
   आली.
* या योजनाकाळात स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात विहित केलेल्या ४.४ या उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे प्रतिवर्षी ४.८% इतकी
   वाढ घडून आली.
* पाचव्या योजनेचा कालखंड १९७४-७९ असा होता. परंतु केंद्रात सत्तेवर नव्या सरकारने हि योजना १९७८ मध्ये एक      वर्ष अगोदर आली.
  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.