शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

दहावी पंचवार्षिक योजना (२००२ ते २००७)

२१ डिसेंबर २००२ रोजी राष्ट्रीय विकास परिषदेने NDC याने दहाव्या पंचवार्षिक योजनेस मान्यता दिली.
* या योजनेने प्रतिवर्षी आठ टक्के दराने आर्थिक विकास साध्य करण्याचे उदिष्ट ठरवले होते. दारिद्रय रेषेखालील
   प्रमाण सन २००७ पर्यंत २१ टक्क्यापर्यंत खाली आणण्याचे उदिष्ट होते.
* सन २००७ पर्यंत साक्षरतेचे प्रमाण ७५% वरून वाढवण्याचे लक्ष केले.
* सन २०१२ पर्यंत लोकसंखेचे प्रमाण १० टक्क्यावरून खाली आणण्याचे तर साक्षरतेचे प्रमाण ८०% टक्क्यावर              नेण्याचे दीर्घकालीन उदिष्ट या योजनेने समोर ठेवले होते.
* अर्भकाच्या मृत्यूचे प्रमाण योजनाअखेर दर दर हजार सजीव जन्मास ४५ % इतके खाली आणण्याचे उदिष्ट होते.
   अर्भकाच्या मृत्यूचे प्रमाण २०१२ पर्यंत २८% इतके खाली आणण्याचे दीर्घकालीन उदिष्ट घेण्यात आले.
* माता मृत्यू प्रमाण ४ वरून २ वर ठेवण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले. देशतील प्रदूषित झालेल्या सर्व मोठ्या नद्यांच्या शुद्धी
   करणाचे पूर्ण करण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले.
* या योजनाकाळात विकासाचा ७.७ टक्के दर साध्य झाला असून तरी दारिद्र्य रेषेखालील लोकसंखेचे प्रमाण प्रत्यक्ष
   लोकसंख्या या योजनाकाळात कमी होण्याएवजी वाढले.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.