गुरुवार, २० सप्टेंबर, २०१८

मलेशियाच्या माजी पंतप्रधानांना अटक - २० सप्टेंबर २०१८

मलेशियाच्या माजी पंतप्रधानांना अटक - २० सप्टेंबर २०१८

* मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रजाक यांना देशाच्या विकास निधीतून कोट्यवधी रुपये लागल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

* विकास निधीतील भ्रष्टाचार प्रकरणी आता त्यांनी गुरुवारी न्यायालयात आरोपांचा सामना करावा लागेल. त्यामुळे रजाक यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 

* भ्रष्टाचारविरोधी संस्थेने बुधवारी नजीब यांना त्यांच्या कार्यालयातून अटक केली सरकारी कंपनी १ एमडीबीमधील निधीतून सुमारे १०३ कोटी डॉलर अर्थात जवळपास ७४ कोटी ७३ लाख रुपये स्वतःच्या बँक खात्यात हस्तांतरित केल्याचा आरोप नजीब यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

* इतकेच नाही तर यापूर्वीदेखील नजीब यांच्यावर विश्वासघात, भ्रष्टाचार आणि मनी लॉन्ड्रींगसारखे आरोप लावण्यात आले आहेत.

* २००९ मध्ये सत्तेत असताना रजाक यांनी देशाच्या आर्थिक विकासासाठी १ एमडीबी निधीची स्थापना केली होती. पण एमडीबीच्या निधीतून कोट्यवधी रुपये त्यांनी आपल्या एमडीबी निधीची स्थापना केली.

* पण एमडीबीच्या निधीतून कोट्यवधी रुपये त्यांनी आपल्या बँक खात्यात टाकले. त्यामुळे त्यांची चौकशी करून रजाक व त्यांच्या पत्नीला देश सोडण्यापासून मज्जाव करण्यात आला होता. पोलिसांनी रजाक यांच्या घरातून १९ अब्ज ५७ कोटी एवढी रक्कम हस्तगत केली. 

देशातील सार्वजनिक बँकाच्या प्रमुखांच्या नेमणूका जाहीर - २० सप्टेंबर २०१८

देशातील सार्वजनिक बँकाच्या प्रमुखांच्या नेमणूका जाहीर - २० सप्टेंबर २०१८

* केंद्र सरकारने दहा सार्वजनिक बँकाच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची निवड बुधवारी जाहीर केली. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडियात कार्यरत पाच उपव्यवस्थापकीय संचालकांचा समावेश आहे. 

* बँक व बँकेचे नवे व्यव्सथापकीय संचालक पुढीलप्रमाणे आहेत.
* इंडियन बँक - पदमजा चुंद्रु
* सेंट्रल बँक ऑफ इंडिया - पल्लव महापात्रा
* आंध्र बँक - जे पॅकिरीस्वामी
* सिंडिकेट बँक - मृत्युंजय महापात्रा
* अलाहाबाद बँक - एस एस मल्लिकार्जुन राव
* बँक ऑफ महाराष्ट्र - ए. एस. राजीव
* युको बँक - अतुल कुमार गोयल
* पंजाब अँड सिंध बँक - एस. हरिशंकर
* देना बँक - कर्णाम शेखर
* युनायटेड बँक ऑफ इंडिया - अशोक कुमार प्रधान

जपानी उद्योजक ठरणार पहिला चंद्र पर्यटक - २० सप्टेंबर २०१८

जपानी उद्योजक ठरणार पहिला चंद्र पर्यटक - २० सप्टेंबर २०१८

* जपानमधील धनाढय उद्योजक युसाकू मायेझवा हे स्पेस एक्स कंपनीच्या रॉकेटमधून चंद्राला प्रदक्षिणा घालणारे पहिले खासगी पर्यटक ठरणार आहे. ही माहिती कंपनीने नुकतीच दिली.

* स्पेसएक्स या अमेरिकन कंपनीचे संस्थापक एलॉन मस्क यांनी ट्विटरवर ही माहिती दिली. युसाकू हे आठ कलावंत व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांसह चंद्रावर स्वारी करणार आहेत.

* अंतराळात जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वाना ते प्रत्यक्षात आणण्याची संधी यामुळे उपलब्द होणार असल्याने हे पहिले व्यवसायिक उड्डाण महत्वपूर्ण ठरणार आहे.

* युसाकू हे ४२ वर्षाचे असून हे कपड्यांची ऑनलाईन विक्री करणाऱ्या झोझोटाऊन या जपानमधील सर्वात मोठ्या कंपनीचे संस्थापक आहेत.

* २.८ अब्ज डॉलरची मालमत्ता असणारे युसाकू म्हणाले की २०२३ मध्ये आपण अंतराळ पर्यटन करणार असून आपल्याबरोबर सहा ते आठ कलाकारही या पर्यटनाचा आनंद घेतील. या पहिल्या व्यवसायिक रॉकेटमधील सर्व जागांचे आरक्षण त्यांनी केले आहे.

* युसाकू यांना घेऊन जाणारे [बिग फाल्कन रॉकेट] बीएफआर हे अजून विकासाच्या अवस्थेत आहे. सध्याच्या त्याची जी रचना साकारली आहे. त्यात या रॉकेटला २०० टन एवढी आहे. या रॉकेटला २०० टन क्षमतेची सात रॅप्टर इंजिने असतील. 

२०५० पर्यंत भारत अमेरिकेला मागे टाकणार - २० सप्टेंबर २०१८

२०५० पर्यंत भारत अमेरिकेला मागे टाकणार - २० सप्टेंबर २०१८

* जागतिक आर्थिक आणि रणनीतीक सत्ताकेंद्र हळूहळू पूर्वेकडे सरकत आहे. जगातील चार मोठ्या अर्थव्यवस्था पैकी तीन अर्थव्यवस्था आशिया प्रशांत क्षेत्रातील आहेत.

* २०२५ पर्यंत जागतिक लोकसंख्येपैकी २/३ लोकसंख्या याच क्षेत्रात राहील. या क्षेत्रात भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने विकसित होत असून २०५० पर्यंत ती अमेरिकेलाही मागे टाकील असे एका अहवालात म्हटले आहे.

* लोई इन्स्टिट्यूटने जारी केलेल्या सर्वेक्षण अहवालानुसार, अमेरिकेची शक्ती क्षीण होत असली तरीही आशिया प्रशांत विभागातून अजूनही अमेरिका एक प्रचंड अर्थव्यवस्था असुन तिचा प्रभाव आहे.

* या विभागात एकूण २५ प्रभावशाली देश आहेत. ज्यात भारत चौथ्या तर पाकिस्तान १४ व्या स्थानी आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत भारत व चीन यांच्यात असलेली मोठी दरी भरून काढणे भारताला नजीकच्या काळात तरी शक्य होणार नाही.

* पण आगामी ११ वर्षात भारत अमेरिकेच्या जवळ पोहोचलेला असेल. २०५० सालापर्यंत भारत अमेरिकेला मागे टाकेल. मात्र भारताच्या मार्गात काही अडथळे आहेत.

* उत्पादन क्षमता, संशोधन व विकास या मापदंडात भारत खूपच मागे पडत आहे. साधने आणि मनुष्यबळ यांचा पूर्ण वापर करणे भारताला शक्य होताना दिसत नाही. असे अहवालात म्हटले आहे.

* आशिया प्रशांत टॉप टेन देश पुढीलप्रमाणे - अमेरिका, चीन, जपान, भारत, रशिया, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया.

* हा अहवाल ११४ मापदंडाच्या आधारे विविध देशांच्या अर्थव्यवस्थांबाबत हा अहवाल तयार केला असून त्यात, देशाची अर्थव्यस्थेची सद्यस्थिती, लष्कर, मुत्सद्देगिरी आणि सांस्कृतिक प्रभाव या क्षेत्रचा विचार करण्यात आला आहे. 

ट्रिपल तलाकच्या वटहुकूमास मंत्रिमंडळाची मंजुरी - २० सप्टेंबर २०१८

ट्रिपल तलाकच्या वटहुकूमास मंत्रिमंडळाची मंजुरी - २० सप्टेंबर २०१८

* मुस्लिम पुरुषाने 'तलाक' हा शब्द तीनदा उच्चारून पत्नीला घटस्फोट देणे [तलाक ए बिद्दत] हा फौजदारी गुन्हा ठरविणाऱ्या वटहुकूमास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर हा कायदा लागू केला जाईल.

* त्यानुसार ट्रिपल तलाक देणाऱ्या पतीला ३ वर्षाचा कारावास व दंडाची शिक्षा होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या ऑगस्टमध्ये ट्रिपल तलाक देणाऱ्या २०१ घटना घडल्या आहेत.

* त्यामुळे मुस्लिम स्त्रियांना न्याय देण्यासाठी अपरिहार्यता म्हणून सरकारला वटहुकूमाचा मार्ग नाईलाजाने स्वीकारावा लागेल. असे केंद्रीय विधी व न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

[न्यायालयातील काही ठळक तरतूदी]

* ट्रिपल तलाक अवैध. त्याने वैवाहिक संबंध संपुष्टात येणार नाहीत.
* दखलपात्र व जामीनपात्र फौजदारी गुन्हा, फक्त कोर्टातून जमीन मिळेल.
* तलाक दिलेली पत्नी किंवा तिच्या कुटुंबातील व्यक्तीच फिर्याद करू शकेल.
* गुन्हा सिद्ध झाल्यास पतीला तीन वर्षे कैद व दंड.
* पत्नीला स्वतःसाठी व मुलासाठी पोटगी व मुलांचा ताबा मागण्याचा हक्क.
* दाखल झालेली फिर्याद उभयपक्षी तडजोडीने मागेही घेता येईल.
* ही प्रकरणे दंडाधिकारी न्यायालयात चालतील. 

बुधवार, १९ सप्टेंबर, २०१८

स्किल इंडिया मोहिमेचे वरुण-अनुष्का सदिच्छादूत - १९ सप्टेंबर २०१८

स्किल इंडिया मोहिमेचे वरुण-अनुष्का सदिच्छादूत - १९ सप्टेंबर २०१८

* अभिनेता वरूण धवन आणि अनुष्का शर्मा आपल्या सुई धागा या मेड इन इंडिया या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय उद्योजक आणि कौशल्यपूर्ण मनुष्यबळाला आणि विशेषतः कारागीर, कलाकार आणि विणकरांना मार्गदर्शन करणार आहेत. 

* याचमुळे स्किल इंडिया या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मोहिमेचा प्रसार आणि चालना देण्यासाठी सदिच्छादूत म्हणून नेमण्यात आले. 

* या चित्रपटातून भारतातील तळागाळातील अत्यंत बुद्धिमान कारागीर आणि कौशल्यपूर्ण कामगारांच्या क्षमतांवर आणि त्यांच्या समोरील आव्हाने तसेच समस्यांवर भर देण्यात आला. 

* भारत हा जगातील सर्वाधिक तरुण देशांपैकी एक देश असून इतके मेहनती आणि उत्साही कोशल्यपूर्ण तसेच उद्योजकतेची कौशल्ये असलेले तरुण आपल्या कामाद्वारे देशाला नाव आणि प्रतिष्ठा मिळवून देत आहेत. 

भारताच्या पहिल्या आयएएस ऍना मल्होत्रा यांचे निधन - १९ सप्टेंबर २०१८

भारताच्या पहिल्या आयएएस ऍना मल्होत्रा यांचे निधन - १९ सप्टेंबर २०१८

* स्वतंत्र भारतातील पहिल्या महिला आयएएस अधिकारी ऍना मल्होत्रा वय ९१ यांचे काल येथे वृध्दापकाळाने निधन झाले.

*  मुंबईजवळील जेएनपीटी बंदर विकासात त्यांची मोठी भूमिका होती. ऍना यांचा जन्म केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यात १९२७ ला झाला.

* कोझिकोडे येथे शालेय शिक्षण झाल्यावर त्या पुढील शिक्षणासाठी चेन्नईला आल्या. १९५१ त्या नागरी सेवेत दाखल झाल्या आणि मद्रास केडर निवडून त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री राजगोपालाचारी यांच्या नेतृत्वात कामाला सुरुवात केली. 

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.